भारतात निर्मित विमरद क्रिएशनची प्रीमियर एअर ड्राय पॉलिमर क्ले च का वापरावी ? भारतात मिळणाऱ्या सर्वच पॉलिमर क्ले अमेरिका , चीन , थायलंड इत्यादी देशातून आयात केल्या जातात. ही परदेशी क्ले वापरायची असेल तर विविध रंगात त्यांनी ठरवलेल्या मापानुसारच विकत घ्यावी लागते. ही क्ले हजारो रंगात उपलब्धही आहे. मात्र आपल्याला ज्या रंगाची जेवढ्या प्रमाणात गरज आहे तेवढेच विकत घेण्याची मुभा किंवा स्वातंत्र्य ठेवलेलेच नाही. जो रंग विक्रेत्याकडे उपलब्ध आहे त्यातूनच कलाकाराला रंग निवडावा लागतो म्हणजेच एका अर्थाने रंग निवडीच्या बाबतीत तडजोड करावी लागते. या सर्वच क्ले खूप टणक असतात आणि मळल्याशिवाय त्यात काम करणे शक्य नसते . ही क्ले हाताने मळणे खूपच जिकिरीचे काम आहे. मग ही क्ले मऊ करण्यासाठी विविध प्रकारची अवजारे विकत घेणे आले . यात क्ले - रोलिंग मशीन , क्ले कटर घेणे क्रमप्राप्तच होते. या परदेशातून आयात केलेल्या सर्वच पॉलिमर क्ले ला ओव्हनमध्ये ( OTG) ( साधा ओव्हन लागतो मायक्रोवेव्ह ओव्हन चालत नाही) बेक केल्याशिवाय फायनल प्रॉडक्ट करता येणे शक्य नाही. ओव्हनमध्ये बेक करणे हे...