Friday, August 9, 2024

भारतात निर्मित विमरद क्रिएशनची प्रीमियर एअर ड्राय पॉलिमर क्ले च का वापरावी?

 

भारतात निर्मित विमरद क्रिएशनची प्रीमियर एअर ड्राय पॉलिमर क्ले च का वापरावी?

 

भारतात मिळणाऱ्या सर्वच पॉलिमर क्ले अमेरिका, चीन, थायलंड इत्यादी देशातून आयात केल्या जातात. ही परदेशी क्ले वापरायची असेल तर विविध रंगात त्यांनी ठरवलेल्या मापानुसारच विकत घ्यावी लागते. ही क्ले हजारो रंगात उपलब्धही आहे. मात्र आपल्याला ज्या रंगाची जेवढ्या प्रमाणात गरज आहे तेवढेच विकत घेण्याची मुभा किंवा स्वातंत्र्य ठेवलेलेच नाही. जो रंग विक्रेत्याकडे उपलब्ध आहे त्यातूनच कलाकाराला रंग निवडावा लागतो म्हणजेच एका अर्थाने रंग निवडीच्या बाबतीत तडजोड करावी लागते. या सर्वच क्ले खूप टणक असतात आणि मळल्याशिवाय त्यात काम करणे शक्य नसते. ही क्ले हाताने मळणे खूपच जिकिरीचे काम आहे. मग ही क्ले मऊ करण्यासाठी विविध प्रकारची अवजारे विकत घेणे आले. यात क्ले-रोलिंग मशीन, क्ले कटर घेणे क्रमप्राप्तच होते. या परदेशातून आयात केलेल्या सर्वच पॉलिमर क्ले ला ओव्हनमध्ये (OTG) (साधा ओव्हन लागतो मायक्रोवेव्ह ओव्हन चालत नाही) बेक केल्याशिवाय फायनल प्रॉडक्ट करता येणे शक्य नाही. ओव्हनमध्ये बेक करणे हे अत्यावश्यकच आहे. प्रत्येक तयार केलेल्या वस्तूला ओव्हनमध्ये बेक करण्यासाठी ठराविक वेळ लागतो आणि त्या वेळेचा अंदाज येण्यासाठी तयार केलेली कलाकृती खराब होणे, बुडबुडे येणे, जास्त तापून तडे पडणे, वस्तू जळणे, रंग काळा होणे, कमी तापल्यावर योग्य निष्कर्ष न येणे आदी बाबींचा सामना करावा लागतो. शाळेतील विद्यार्थ्यांना वापरायचा म्हटलं तर शाळेत ओवन कुठून आणणार आणि कलाकारांना वापरायचं म्हटलं तर मायक्रोवेव्हच्या जमान्यात जुना ओव्हन कशाला? आणि एवढा खटाटोप करूनही आपण मेहनतीने तयार केलेली कलाकृती ओव्हनमध्ये टाकल्यानंतर जळणे, फुगणे, काळी होणे किंवा तुटणे या सर्व शक्यता आल्याच. म्हणूनच आज भारतातच नव्हे परदेशातही कुठल्याही शाळेमध्ये पॉलिमर क्लेचे प्रकल्प विद्यार्थ्यांकडून करून घेतले जात नाहीत. (यात या क्ले विषयी नकारात्मकता दाखवणे हा हेतू मुळीच नाही त्या क्ले च्या मर्यादा स्पष्ट होणे गरजेचे आहे)

मग याला पर्याय शोधण्यासाठी कलाकार, विद्यार्थी, कलाप्रेमी इंटरनेटवर *पॉलिमर प्ले मऊ कशी करावी? ओटीएस ओवन ऐवजी मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये पॉलिमर क्ले बेक केल्यास चालेल का? मला हवा असलेला रंग पॉलिमर क्लेमध्ये कुठे उपलब्ध होईल? तयार केलेली कलाकृती ओव्हनमध्ये किती वेळ बेक करायची? तयार केलेल्या कलाकृतीवर वरून रंग दिला तर चालेल का? नैसर्गिक हवेतच वाळणारी पॉलिमर क्ले कुठे उपलब्ध आहे का? यासारख्या प्रश्नांचा भडीमार सर्वत्र बघायला मिळतो! यातूनच ते वापरण्याची इच्छा असलेले विद्यार्थी, कलाकार, हौशी कलाकार विदाऊट (नैसर्गिक हवेतच वाळणारी) बेक  पॉलिमरक्ले शोधत असतात!

एअर ड्राय क्ले

 खरे पाहता भारतात खूप आधीपासून शाडू माती उपलब्ध आहे व प्रचंड मोठ्या प्रमाणात वापरली जाते, मागील काही काळापासून टेराकोटा क्ले वापरण्याचे प्रमाणही भरपूर वाढले आहे. भारतात वापरण्यात येणाऱ्या या क्ले कलाकारांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, हौशी कलाकारांसाठी सर्वोत्तमच आहेत यात शंकाच नाही.

मात्र या क्षेत्रातही परदेशातनिर्मित एअर ड्राय क्ले आज आपल्याला भारतीय बाजारात बघायला मिळतील. परदेशातनिर्मित पॉलिमर क्ले प्रमाणेच या परदेशातनिर्मित एअर ड्राय क्ले वापरण्यासाठी इंटरनेट विशेषतः सोशल मीडिया मोठा वर्ग संमोहित करत आहे, यामुळेच भारतात निर्मित शाडू माती आणि टेराकोटा क्लेचा वापर कमी होवून परदेशी एअर ड्राय क्ले धुमाकूळ घालत आहेत. मात्र या पॉलिमर क्लेची बरोबरी करू शकत नाही हेही खरे आहे, कारण दणकट वस्तू बनविण्यासाठी, नाजूक सुंदर सुबक वस्तू बनविण्यासाठी या प्रकाराच्या क्लेमध्ये मर्यादा येतात. या क्लेद्वारे निर्मित वस्तूंना वस्तू पूर्ण झाल्यानंतर वरूनच रंग द्यावा लागतो आणि नेमकं काही वस्तू तयार करताना वरून रंगकाम करणे कठीण होते. अनावधानाने बनवलेली कलाकृती खाली पडल्यास तुटण्याची शक्यता जास्त असते. यासाठी मार्केटमध्ये विविध कंपन्यांच्या एअर ड्राय क्ले आहेत त्यापैकी काही दणकटही आहेत. त्यामध्ये रंग मिसळता येणे शक्य होत नाही, वरूनच रंगकाम करावे लागते, बारीक नाजूक सुबक काम करणे अवघड जाते आहे. यात थायलंड मधून आयात होणाऱ्या अतिशय महागड्या थाई क्लेचा ही समावेश आहे.

लवकरच या परिस्थितीतून ग्राहक, विद्यार्थी, कलाकार, हौशी कलाकार यांना दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत ही किमया केली आहे विमरद क्रिएशनने.

विमरद क्रिएशन निर्मित प्रीमियम एअर ड्राय पॉलिमर क्ले

विमरद क्रिएशनने भारतात निर्मित ऑरगॅनिक पॉलिमरपासून एक प्रीमियम एअर ड्राइंग पॉलिमर क्ले तयार केला आहे. क्लेवर्क करू इच्छिणाऱ्या सर्वच गटांना एक उत्तम पर्याय राहील असा विश्वास मला वाटतोय कारण मी स्वतः 2016 पासून हा क्ले वापरतोय. विशेषतः पुणे शहरात अनेक ग्राहक, कलाकार, विद्यार्थी, हौशी कलाकार, विविध हॉबी क्लासेस, व्यावसायिक, महिला उद्योजक, संस्था, विद्यालय हा क्ले अनेक दिवसांपासून वापरत आहेत. अनेक हॉबी क्लासेसमध्ये या क्लेचा वापर सुरू आहे. अनेक कलाकारांनीदेखील या क्लेचा वापर करून आपल्या सुंदर कलाकृतीची निर्मिती केली आहे व आपल्या कलाकृती विविध प्रदर्शनातून विक्री करीत आहेत. पुण्यातील व्हीनस ट्रेडर्स, एसपी स्टेशनर्स, सम्राट लेस, सम्राट मेगा मार्ट, कला निर्मिती, एबीसी स्टेशनर्स, मॉडर्न पेपर, बॉम्बे बुक स्टॉल, कॉमेट, विक्रांत, आर्टिस्ट कट्टा, माय स्टेशनरी, मॅक्सा, त्रिमूर्ती ट्रेडर्स व पिंपरी चिंचवडमधील केतन स्टेशनरी, सागर स्टेशनरी, प्रथमेश स्टेशनरी या ठिकाणी गेल्या पाच वर्षापासून या क्लेची विक्री सुरू आहे. विद्यार्थ्यांसाठी काही वर्कशॉप देखील झाले आहेत. पाच वर्षे वयापासून ते साठ वर्षापर्यंतचे कलाप्रेमी यात सहभागी होऊन त्यांनी ही विमरद क्रिएशन निर्मित प्रीमियम एअर ड्राय पॉलिमर क्ले वापरण्याचा आनंद घेत आहेत, व अतिशय सुंदर कलाकृती देखील तयार केल्या आहेत. पुणे येथील कलाकार निरंजन पाडगावकर, मीनल काणे, शिवानी सूर्यवंशी, मुग्धा पाटील, उज्वला देशमुख तर मुंबई येथे निलेश खरे, मुकुंद जहागीरदार, सुनील येवले, शरीफ शेख आदी अनेक कलाकार या क्लेचा वापर नियमित करीत आहेत.

 

विमरद क्रिएशनच्या प्रीमियर एअर ड्राय पॉलिमर क्लेद्वारे निर्मित वस्तू, कलाकृती पूर्ण झाल्यानंतर त्या टिकाऊ दणकट आणि आकर्षक दिसण्यासाठी वुडन वार्निश, रेझिन, ट्रान्सपरंट नेलपॉलिश यापैकी कशानेही पॉलिश करणे योग्य ठरेल.

 

 

No comments:

Post a Comment

Behind the Scenes at Vimrad Creations: The Making of Shilpey Clay

Introduction: Every artist knows that the quality of their material defines the soul of their creation. At Vimrad Creations , we believe tha...